अश्लील फोटोसंदर्भात भाजप खासदार पाटील यांचं स्पष्टीकरण

Update: 2019-04-08 14:04 GMT

ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव येथील भाजपचे विद्यमान खासदार एटी नाना पाटील यांचे कथित अश्लील फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यानंतर काहीसे शांत असलेले खासदार पाटील हे अचानक आक्रमक झाले आणि त्यांनी भाजपचा प्रचार न करण्याचा निर्णयच जाहीर केला.

भाजपचे खासदार एटी नाना पाटील यांचे ते कथित अश्लील फोटो व्हायरल करण्यामागे कुणाचा हात असेल, याविषयी अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर आज खुद्द ए टी नाना पाटील यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी षडयंत्र रचून आपली बदनामी केल्याचा थेट आरोपच ए टी नाना पाटील यांनी जाहीर मेळाव्यात केलाय. वाघ यांची पत्नी स्मिता यांना आधी भाजकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली होती. स्मिता यांनी प्रचारही सुरू केला होता. मात्र, उमेदवारी दाखल कऱण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपनं अचानक चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली.

उन्मेष पाटील यांना आमदार करण्यात ए टी नाना पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. उन्मेष पाटील हे आपले शिष्य आहेत, त्यांना आमदार करा असं आवाहन त्यावेळी केलं होतं. भाजपनं स्मिता वाघ यांची उमेदवारी कापल्यानंतर उन्मेष यांना तिकीट देण्यात आलं. मात्र, ए टी नाना पाटील यांच्या त्या कथित अश्लील फोटो प्रकरणात उन्मेष पाटील यांचाही हात असल्याचा आरोप करत आपण भाजपचा प्रचार करणार नाही, असा पवित्रा ए टी पाटील यांनी घेतलाय.

Similar News