मुख्यमंत्री कोणाचा? जागा वाटपात युतीची रश्शीखेच...

Update: 2019-09-22 09:21 GMT

भाजपच्या एखाद्या नेत्यानं मुख्यमंत्री भाजपचाच असे जाहीर रित्या म्हणायला सुरवात केली की समजावं, एकतर शिवसेनेला कमी जागा द्यायच्या किंवा युती तोडायची. 2014 च्या विधानसभा निवडणुकांतही ऐनवेळी भाजपने युती तोडली होती. तेव्हा भाजपने एकनाथ खडसे आणि आशिष शेलार या नेत्यांना पुढे केले होते. आताही आशिष शेलार यांनाच पुढे करून युतीचे काही खरे नाही? असे संकेत तर भाजप देत नाही ना? असं राजकीय जाणकारांना वाटतं.

https://twitter.com/ShelarAshish/status/1175685255820390400

 

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं नाव घेऊन मुख्यमंत्री भाजपचाच असं ट्वीट अशिष शेलार यांनी केलं आहे. भाजपच्या गोटात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आल्याने त्यांना टिकीटं कशी द्यायची असा प्रश्न आता भाजपा पुढे आहे. म्हणुनच पन्नास च्या पुढे जागा तर घ्याव्याच लागतील. पण शिवसेना मात्र कमी जागा घेण्यास तयार नाही यातून काय मार्ग निघतो हे आता अंतिम निर्णय झाल्यावरचं कळेल.

 

 

Similar News