शनिवारी शिवाजी पार्क इथं मनसेचा पाडवा मेळावा पार पडला. या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या वर टीका केली. याला भाजपकडून आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उत्तर दिले.
''काल राज ठाकरे यांनी मोदीजी आणि अमित शहा यांच्या विरोधात इतका राग व्यक्त केला. राहुल गांधींच्या हातात देश द्या, खड्ड्यात तरी घालेल नाहीतर चालवेल तरी... अरे ती काय मनसे आहे का ? खड्ड्यात घालायला तो देश आहे. 125 कोटींचा देश आहे. ही कुठली भाषा आहे ? एक तर स्वतःच इंजिन बंद पडलं आणि राहुल गांधी पंतप्रधान झालेलं शरद पवार यांना चालणार आहे का? हे विचारा आधी'' असा टोला तावडे यांनी मारला आहे.पाहा काय म्हणाल तावडे...