पक्षाने न मागता सर्वकाही दिले, सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करूः बाळासाहेब थोरात

Update: 2019-11-26 14:57 GMT

काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आल्याची घोषणा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत केली.

यावेळी बोलताना आ. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करून पुन्हा एक मोठी जबाबदारी दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी, मल्लिकार्जुन खर्गे तसेच काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांचे आभार मानले, आणि आपण सर्वांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यरत राहू असा विश्वास व्यक्त केला.

हे ही वाचा

उद्धव ठाकरेंचा पत्ता बदलणार

पत्रकारांवर हल्ला कराल तर सावधान! तीन वर्षासाठी खावी लागणार जेलची हवा…

अजित पवार यांनी दिला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

२३ नोव्हेंबरला विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता व अन्य पदाधिकारी निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांना देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार काँग्रेस आमदारांच्या बैठकीत खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करत असल्याची घोषणा केली.

या घोषणेनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. डॉ. नितीन राऊत, आ. के. सी. पडवी, आ. विजय वडेट्टीवार, आ. अमिन पटेल, आ. वर्षाताई गायकवाड, आ. यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजीत कदम, आ. शरद रणपिसे, आ. भाई जगताप यांनी बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक आज जे. डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत, बस्वराज पाटील, आमदार यशोमती ठाकूर, आमदार डॉ. विश्वजीत कदम, मुझफ्फर हुसेन, आमदार के. सी. पडवी, आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नसीम खान, आमदार सतेज पाटील, खासदार बाळू धानोरकर, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे नेते आमदार शरद रणपिसे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बी. एम. संदीप यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व नवविर्वाचित आमदार उपस्थित होते.

Similar News