‘आरएसएस’च्या शिलेदाराला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी ?

Update: 2019-04-01 16:07 GMT

भीमा कोरेगाव प्रकरणात ज्या मनोहर (संभाजी) भिडे गुरुजींवर प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली. त्याच भिडे गुरुजींच्या कट्टर समर्थकाला प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दिल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

गोपीचंद पडळकर हे संभाजी भिडे यांचे कट्टर समर्थक असल्याची छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. पडळकरांना उमेदवारी दिल्यामुळे सोशल मीडियावर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.

नेहमीच आरएसएस विरोधी भूमिका घेणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी जर पडळकर यांना उमेदवारी दिली तर वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. तसंच आज अनेक वंचित बहुजन आघाडीमधील कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान या संदर्भात आम्ही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधला असता, त्यांनी अशा प्रकारचा अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्याचं सांगितलं. तसंच या संदर्भात पक्ष उद्या आपली भूमिका मांडणार असल्याचं स्पष्ट केले.

Similar News