खरडुन गेलेल्या जमीनींना भरीव मदत करा: विरोधी पक्षनेत्या्ंची मागणी

Update: 2022-08-20 14:54 GMT

कन्नड तालुक्यातील चापानेर,रामनगर येथील अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून शेततऱ्यांना तातडीने शासनाने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

प्रथम शेतीच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून करत NDRF चे निकष न लावता माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी ज्याप्रमाणे गेल्यावर्षी सरसकट मदत जाहीर केली त्याप्रमाणे मदत करण्यात यावी. खरडुन गेलेल्या जमीनींना आगामी काळाचा विचार करून भरीव मदतीची तरतुद करावी. पुरग्रस्त भागातील दगावलेल्या जनावरांची भरपाई मिळावी. तसेच अती पावसामुळे बऱ्याच विहीरी ढासळून गेल्या आहेत. याबाबत कोणतीही मदत शासनाकडून तरतुद केलेली नाही ती त्वरीत करावी अशा सूचना यावेळी अंबादास दानवे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी आमदार उदयसिंग राजपूत, तालुका कृषी अधिकारी बळीराजा मुळीक, नायब तहसीलदार सोनवणे मॅडम, मंडळ अधिकारी अ.बा.पाटील

यांची उपस्थिती होती. तसेच माजी महापौर त्रंबक तुपे, विधानसभा संघटक अण्णा शिंदे,उपजिल्हाप्रमुख अवचित नाना वळवळे,संतोष जेजुरकर, संजय मोटे , बाबासाहेब मोहिते, पद्माकर इंगळे, योगेश पवार, शरद शिरसाठ, ता.संघटक रूपाली ताई मोहिते, गिताराम पवार, विलास पवार, गोकुळ डहाके, उमेश मोकासे, शंकर नवले,गंम्पु जाधव गावकरी,शेतकरी आदी उपस्थित होते.

Tags:    

Similar News