दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात आहे, असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल व्यक्तव्य केले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना अजित पवार यांनी केंद्र सरकारनं हटवादीपणा सोडायला हवा, असं म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. केंद्रीय मंत्री शेतकऱ्यांची चर्चा करतात पण तोडगा निघत नाही. हा कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचा नाही, त्यामुळे आधीचाच कायदा कायम ठेवावा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. तसेच कोरोनाची लस आल्यावर लसीकरणाबाबत राज्य सरकारची तयारी योग्य पद्धतीनं सुरु आहे.
आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांसोबत लष्करी जवानांनाही सर्वात आधी लस देण्याबाबत प्रयत्न केला जाईल, असं अजित पवार म्हणाले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये योग्य समन्वय राखला जात आहे. ५० वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना आधी लस दिली जाईल, माहिती अजित पवार यांनी दिली.