महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचं वारं वाहत असून आता जागा वाटपासाठी युतीमध्ये चढाओढ सुरु आहेच मात्र, मित्रपक्षांमध्येही आपल्या सोयीच्या जागा मिळवण्यासाठी धडपड चालली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याशी याविषयी बोलताना, महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला असुन रिपब्लिकन पक्षाला सहा जागा मिळणार आहेत. तरीदेखील आम्ही दोन जागांची मागणी जास्त करणार असल्याचं सांगितलं.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे, आदित्य ठाकरे सहाव्या मजल्यावर जाणार का? असे विचारले असता, "आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत, सहाव्या मजल्यावर इतरही केबिन आहेत" असं आठवले यांनी सांगितलं. आदित्य ठाकरे अजून मुख्यमंत्री पदासाठी तयार नसून, उपमुख्यमंत्रीपद असल्याचं ठरल्यास तिथं शिवसेनेचंच स्थान असेल असेही त्यांनी म्हटलं आहे.
https://youtu.be/fR9QhSXjpsE