विधानसभा उमेदवारांची ‘आप’ची दुसरी यादी जाहीर

Update: 2019-09-29 12:21 GMT

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. आम आदमी पक्षानं (Aam Aadami Party) राज्यात ३५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, उद्योजक, उच्चशिक्षितांना निवडणुकीत तिकीट देताना प्राधान्य दिलं जाईल असं असं ‘आप’ने जाहीर केलं होतं. त्यानुसार २३ सप्टेंबरला पक्षाची पहिली उमेदवारांची यादी जाहीर झाली होती.

राज्यातले प्रस्थापित पक्ष युती आणि आघाडीच्या चर्चा करत असताना ‘आप’सारख्या पक्षाने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. ‘आप’शिवाय वंचित बहुजन आघाडी आणि ‘एमआयएम’ने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

उमेदवाराचे नाव मतदार संघ

कैलास फुलारी – जालना

नरेंद्र भांबवानी – मीरा रोड

मुकुंद किर्दत – शिवाजी नगर

गणेश धमाले – वडगाव शेरी

खतीब वकील – मध्य सोलापूर

सुनील गावीत – नवापूर

अल्लामाश फौजी – मुंब्रा-कळवा

Similar News