राज्यात महिलांवरील अत्याचाराचा आकडा वाढत चालला आहे. यावरुन या 'राज्यात गृहमंत्रीचं नाही' असं परखड मत तृप्ती देसाई यांनी मॅक्स महाराष्ट्रवर मांडले आहे. राज्यात महिलांवर होणारे अन्याय अत्याचार विरुद्ध लढा देण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचा लढा असाच सुरू राहणार आहे. लवकरचं महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात ताईगिरी पथक स्थापन करण्यात येणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले.