मुलींवर होणा-या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी राजकीय इच्छा शक्तीची गरज

Update: 2017-10-22 16:01 GMT

पुण्यात धायरी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा खून झाल्यानंतर शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गो-हे यांनी ससून रुग्णालयाचे डॉक्टर्स, तसचं पीडितेचे नातेवाईक व तपास करणारे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची आज भेट घेऊन या प्रकरणा संदर्भात पोलिसांना सुचना केल्या.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. गो-हे यांनी राज्यात अशा घटना घडू नयेत म्हणून पोलिसाचं संख्या बळ वाढवण्याची गरज असल्याचे सांगत समाजात मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान मुंबईमध्येही एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या मारहानप्रकरणी देखील त्यांनी यावेळी निषेध नोंदवत या घटनेच्या चौकशीसाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी गो-हे यांनी सांगितले आहे.

 

Full View

Similar News