बीडमधल्या ठाणापूर गावात जयश्री जमदाडे या महिलेला तीन मुलं असून तिचा नवरा व्यसन आहारी गेला आहे. जयश्रीचा नवरा दररोज दारू पिऊन तीचा छळ करत असे तिला जीवे मारण्याची धमकी देखील देत असल्यामुळे ती कंटाळून तिच्या माहेरी राहते. परंतु व्यसनी नवरा घर विकण्यास काढत असल्याचे कळताच तिने ही बाब सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांना सांगितली. सरकारी धोरणानुसार त्या जागेवर पती-पत्नी दोघांचाही समान अधिकार असल्यामुळे पत्नीच्या परवानगीनुसार ''ही जागा कुणी विकत घेऊ नये'' असा फलक लावण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांच्या मदतीने हा फलक लावण्यात आला आहे.