सजीवाच्या उत्पत्तीमध्ये प्रजनन हा अविभाज्य घटक आणि अतुलनीय घटक आहे. नरमादीच्या संयोगातून प्रजनन होते, यामध्ये नरमादी तितकेच महत्वाचे राहते. परंतु संयोगानंतर मादी महत्वाचा घटक राहतो, कारण मादीच्या उदरामध्ये गर्भधारणा होते, गर्भ वाढला जातो. काय म्हणावं निसर्गाला कारण निर्मितीचा किमयागार जीवाला जीव देण्याचं जन्माला घालण्याचा मान स्त्रीला देतो. अगदी वयात आल्यावर मुलींच्या शारिरीक मानसिक बदल प्रामुख्याने मुलांपेक्षा जास्त होतात. कारण मुलींच्या उदरातील गर्भाशयात बीजाअंडाच्या निर्मितीमुळे मुलीला मासिक धर्म म्हणजेच पाळी सुरू होते. पण 5 %मुलींना गर्भाशयच नसतं, गर्भाशयाविना स्त्री..? मग लग्न, संसार आणि मुलं शक्य तरी कसं? असे एकना अनेक प्रश्न या प्रश्नापेक्षा महत्वाचे इतर स्त्रिया बरोबरीनं तिची मातृत्वाची ओढ आणि जगात मातृत्वाला कशाचीच तोड नाही. म्हणूनच मातृत्वापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी पुण्यातील गॅलकसी हॉस्पिटलमध्ये एक नवा अध्याय लिहिला गेला. आईचा गर्भ मुलीला यशस्वीरित्या बसवला गेला. महत्वाचं म्हणजे या २३ वर्षीय मुलीला जन्मापासून गर्भ नव्हता. त्यामुळे ही गर्भाशय प्रत्यारोपणाची प्रक्रिया किचकट असेल याची कल्पना न केलेली बरी.
गेलेक्सी केअर फरर्टीलिटी सेंटरचे संचालक डॉ शैलेश पुणतांबेकर यांच्या नेतृत्वाखालीही प्रत्यारोण शस्त्रक्रिया झाली आणि अजून तात्काळ 21 गर्भाशय प्रत्यारोपणासाठी 'वेटींग लिस्ट'मध्ये असल्याचे पुणतांबेकरांनी सांगितले.
खरं-तर मुलं झाली, की पाळी नकोच वाटते स्त्रियांना. मग गर्भाशय काढून टाकण्याचा कल ग्रामीण भागातील स्त्रियांचा असतो, पण असे ज्याला गर्भाशय नको आहे किंवा देयच आहे असे गर्भाशय गरजवंत स्त्रीला लाभू शकते आणि या शत्रक्रिया इतर अवयवाच्या प्रत्यारोपणासारखीच असून यासाठी येणारा खर्च देखील हृद्यप्रत्यारोपणासाठी येतो तितकाच आहे. कालावधीही तीन आठवाड्यांचाच आहे, त्यामुळे आता आई होण्याचा मार्ग आणखीन सुलभ झाला असून तितकासा अशक्य कठीण राहिला नाही.
बाईला गर्भधारणा होत नव्हती, तेव्हा दत्तक घेण्याचा पर्याय उपलब्ध झाला. वैद्यकशास्त्रातील संशोधनाने टेस्टट्यूब बेबी आणि सरोगसी हे पर्याय उपलब्ध झाले. सध्या सरोगसीचा पर्याय सर्रास वापरला जातो. अनेकांना याचा लाभ झाला, पण यामध्ये फार मोठी अर्थव्यवस्था दडली होती. अगदी गुंडांच्या टोळक्यासारख्या सरोगसी करणाऱ्या महिलांच्या टोळ्या आहेत. त्यामुळे फायदा आला, की तोटा पण येतोच. पण आता गर्भाशय प्रत्यारोपण या अशा तोट्याना छेद देईल, त्याबाबत आशा आहे. कारण सरोगसीमध्ये अनेक दापत्याना अशा महिलानी पैशासाठी भरडलं आहे. पण यामध्ये अनेक महिलांनी प्रामाणिकपणे सरोगसी केली आहेतच की, पण सध्या सरोगसीमुळे आईपण विकाऊ वाटत होतं. ते आता थेट प्रतारोपणामुळे नाही वाटणार, ही आशा आहे. त्याबरोबर गर्भाशय प्रत्यारोपण प्रक्रियेतदेखील पूरक कायदा होणे अपेक्षित आहेत, ज्यामुळे सरोगसी टोक्यासारख्या टोळ्या यात तयार होणार नाहीत.