इराणी महिलांना पुरुषांचे खेळ सुरु असतांना स्टेडियम मध्ये प्रवेश दिला जात नाही त्यामुळेच इराणी महिला पत्रकारांना पुरुषांच्या कुठल्याचे खेळाचे चित्रीकरण अथवा फोटो काढता येत नाही मात्र परिसा पोरताहिरीणा हिने महिला पत्रकारना असलेली ही बंदी झुगारुन पुरुष फुटबाॅलच्या खेळाचे फोटो आपल्या कॅमेरात कैद केले आहेत. ते करण्यासाठी तिला स्टेडियमजवळ असलेल्या इमारतीवर चढावे लागले सिटेडियम मध्ये जाण्यास बंदी असल्याने ,या इमारती वरून तिने फोटो काढले. यामुळे ती राष्ट्रीय खेळाचे चित्रीकरण करणारी पहिली ईराणी महिला पत्रकार ठरली आहे. तीच्या या धाडसाचे जगभरातून कौतुक होत आहे.