जगाच्या विकासात महिलांचे योगदान हे प्रामुख्याने महत्वाचे आहे व तेच अधोरेखीत करण्याच्या उद्देशाने बीबीसी हिस्ट्री या मासिकाने जग बदलण्यासाठी ज्या प्रमुख १०० महिला होत्या त्यांची नावे जाहिर केली आहेत, त्यात मॅदम क्युरी या प्रथम स्थानावर असुन मदर तेरेसा या २० व्या स्थानावर आहेत याबरोबरच सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, अमृता प्रितम यांचाही समावेश करण्यात आला आहे.