मॅक्स वूमन... शोध अस्तित्वाचा या नवरात्री स्पेशलमध्ये धुळे जिल्ह्यातील विशेष शिक्षक अरुणाताईंनी स्वत:च्या दृष्टिहीनतेवर मात करत दिव्यांग मुलांच्या जीवनात पेटवली प्रकाशज्योत... वयाच्या पाचव्यावर्षांपासून जीवनात अंधार निर्माण झालेला असून जिद्दीच्या रोशनाईवर अरुणाताई यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. तसेच आपला संसार थाटून आज त्या सर्वशिक्षण अभियानातंर्गत धुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत एक विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहे. ते दिव्यांग मुलांना प्रशिक्षण देत आहे. वयाच्या 5व्या वर्षी म्हणजेच खेळण्याच्या वयात आपली दृष्टी गमावलेल्या अरुणाताईंनी जिद्दीच्या जोरावर समाजासमोर एक आर्दश निर्माण केला आहे. त्यांनी सिद्ध करुण दाखवले की जिद्द असेल तर दृष्टीचीही गरज नसते...