लेखिका अॅना बर्न्स यांना 'मॅन बुकर' पुरस्कार जाहीर

Update: 2018-10-17 12:50 GMT

यंदाचा साहित्य जगतातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा 'मॅन बुकर' हा ५०वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार उत्तर आर्यलंडच्या लेखिका अॅना बर्न्स यांना देण्यात आला आहे. अॅना बर्न्स यांच्या 'मिल्कमॅन' या कादंबरीसाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

उत्तर आर्यलंडच्या कठीण परिस्थितीशी सामना केल्याने बर्न्स यांना मिल्कमॅन लिहिण्याची प्रेरणा मिळाली. "मिल्कमॅन" हि सामाजिक दबाव, राजकारण आणि अफवा यांच्यामधून स्वत:चा मार्ग शोधणाऱ्या मुलीची कथा आहे. या कादंबरीसाठी त्यांना हा ५० हजार पौंडांचा पुरस्कार देण्यात आला आहे.

काय आहे हा 'मॅन बुकर' पुरस्कार -

हा पुरस्कार अनुवादित इंग्रजी पुस्तकांसाठी दिला जातो.

२००५ पासून हा पुरस्कार दर दोन वर्षांनी दिला जात होता.

२०१६ सालापासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जात आहे.

 

 

 

Similar News