महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याचे कारण होते, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या बीड येथील सभेवर सोशल मीडियावरच्या कमेंटवरती पुण्यातील महिला कार्यकर्त्यांवर टिका करुन अश्लिल शेरेबाजी केली होती. ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शरद पवारांच्या बीडमधील सभेनंतर पंकजा यांनी आपल्या जिल्ह्यात लक्ष द्या अशी पवारांवर टिका केली होती. त्यांच्या त्या वक्तव्यावरुन पुण्यातील एका महिला कार्यकर्तीने 'ताई स्वत: ला सावरा' अशी पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केली व त्यामुळे त्या महिलेला पंकजाजींच्या समर्थकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मुंडे समर्थकांनी शेरेबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या समर्थकांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला गेला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या समर्थकांची नावे-
आसाराम सानप, सुनिल एन फड, मनोज मुंडे, पोपट फुंदे, सुशेन नागरगोजे, दादा कुटे, योगेश देवरे, ज्ञानदेव खेडकर, सॅम गदादे, शरद वाघ, महेश एन एम मुंडे, गणेश नागरे, श्रीकांत घोळवे, दिनेश मुंडे.