लहानपणापासून वाढत असताना मला कधीच कळलं नाही की ती आपला इतका वेळ अनोळखी लोकांसाठी का देतेय. आज जेव्हा गरीब आणि गरजूंसाठी तिचं निस्वार्थ भावनेने सुरू असलेलं अविरत काम आणि त्याबदल्यात तिला मिळत असलेलं प्रेम पाहिल्यानंतर तिला माझी आई म्हणताना मी भाग्यवान असल्यासारखं वाटतंय.
हे ट्वीट आहे अजित दादांचा मुलगा पार्थ पवार याचं. डॉ. तात्याराव लहाने, रागिणि पारेख यांच्या मदतीने सुनेत्रा पवार दरवर्षी बारामतीत आसपासच्या रूग्णांसाठी डोळ्याचा कँप भरवतात. या कँपमध्ये दरवर्षी शेकडो शस्त्रक्रीया केल्या जातात आणि रूग्णांना नवीन दृष्टी दिली जाते. सुनेत्रा पवार यांचं काम पाहिल्यापासून आता शरद पवार दरवर्षी या कँपला हजेरी लावतात, आणि रूग्णांशी संवाद साधण्यासाठी आपला वेळ देतात. आजपर्यंत बारामतीतल्या सार्वजनिक कामांमध्ये पार्थ पवारने कधीच लक्ष घातलं नव्हतं. मात्र या वर्षी त्यानेही या नेत्रशिबीराचं काम पाहून आईची तारिफ करणारं ट्वीट केलंय.
https://twitter.com/parthpawar21/status/1037054189371891714?s=12