ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच खातरजमा न करता राजीनामा दिला - सुप्रिया सुळे
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव तारिक अन्वर यांनी काल पक्षाला रामराम ठोकल्यानंतर पवारांना मोठा धक्का बसला. शरद पवारांच्या बाजूने अन्वरांना प्रत्युत्तर देण्यास खासदार सुप्रिया सुळे सज्ज झाल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकांउटवर ट्विट करुन अन्वरांना प्रतिउत्तर दिले आहे.
त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, तारिक अन्वरजी ‘आपने दिल तो तोड दिया.’ राजीनामा देण्यापूर्वी एकदा तरी आमच्याशी बोलायला हवं होतं. वाईट या गोष्टीचं वाटतं की, ज्या माणसावर प्रेम केलं, विश्वास ठेवला, नेता मानला त्यांनी खातरजमा न करता राजीनामा दिला. तसेच त्यांनी आपल्या या ट्विटतर्फे असं होत असेल तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.