लोकल प्रवासा दरम्यान तेजश्री वैद्य ही तरुणी खाली पडुन जख्मी होउन तीन महिने झाले. तरीही तीला कुठल्याही प्रकारची मदत रेल्वे विभागाकडुन मीळालेली नाही. तेजश्री गंभीर जख्मी असुन विवीध वैद्यकीय मदतीची तिला आवश्कता असल्याचे कुटुंबीयानी सांगितले आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडे तेजश्री अपघातात केवळ बेशुद्ध असल्याची नोंद असल्याने कुटुंबीयांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे धाव घेतलेली आहे, आपले दुखः कुटुंबीयानी पत्रात लिहुन रेल्वेमंत्री गोयल यांच्याकडे पाठवले असले तरी या पत्राचे उत्तर अजुनही आलेले नाही त्यामुळे तेजश्रीला न्याय कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.