तनुश्री दत्ताच्या आरोपांबाबत काय म्हणाला आमीर खान?

Update: 2018-09-27 13:34 GMT

आमीर खानच्या आगामी ठग्ज ठग्ज ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाचा आज ट्रेलर लाँच करण्यात आला. त्यावेळी या लाँचवेळी सगळेच कलाकार उपस्थित होते. उपस्थित कलाकारांना अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत विचारले असता आमीर याबाबत आपले मत व्यक्त केले.

आमीर म्हणाला की, "एखाद्या गोष्टीबाबत तुम्हाला पूर्ण माहिती नसेल, तर त्यावर बोलणं कठीण आहे. जर असं झालं असेल, तर ते चुकीचं आहे. मी यावर अधिक बोलू शकत नाही. या गोष्टीची चौकशी व्हायला हवी"

Similar News