तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर जवळीक साधल्याचा आरोप केला होता. या मुद्द्यावरुन चांगलीच चर्चा रंगली. काहींनी नाना पाटेकरांना पाठिंबा दिला तर काहींनी तनुश्रीच्या बाजूने कौल दिला. तर काहींनी याबाबत मौन पाळणेच उचित समजले. या तिच्या आरोपाबाबत अभिनेत्री प्रिती झिंटाने आता तिचे मत व्यक्त केले आहे.
प्रिती म्हणाली की, "हि फक्त भारतातील समस्या नाही आहे. बाकी देशांत पण हे असे प्रकार घडत आहे. हि समस्या आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे आणि हे स्वीकारण्याची वेळ देखील आली आहे. जर तुमच्याकडे काही चांगले बोलायला नसेल तर शांत राहणेच योग्य असेल. हि समस्या स्त्री-पुरुष दोघांच्या बाबतीत आहे. रात्री २ वाजता कामानिमित्त बोलवल्यावर जाण्याआधी जर डोक्याने विचार केला पाहिजे. माझ्यासोबत अशी कोणती गोष्ट घडली असती तर मी याबाबत नक्कीच काहीतरी केले असते, पण मी नशीबवान आहे की अशा कोणत्याही समस्येला मला सामोरे जावे लागले नाहीये."