लहान मुलांच्या आणि मातांच्या आरोग्याबात जागतिक पातळीवर चर्चा सुरू आहेत. भारतातही हा मुद्दा सध्या चर्चेत आहे. बिहारच्या मुज्जफरनगर येथे १५० पेक्षाही जास्त मुले दगावली, वरकरणी यासाठी चमकी ताप यासाठी कारणीभूत असला तरी दगावलेल्या मुलांच्या मातांकडे आपण पाहिले तर लक्षात येते की कमी वयात लग्न झालेल्या या सर्व महिला आहेत. त्याबरोबरच लवकर मुल होणे व दोन मुलांच्या वयात कमी अंतर असणे यामुळे या माताच कुपोषीत असतात व त्याचा पुढे परिणाम हा मुलांच्या शारिरीक स्वास्थावर होतो.
मुल व माता जर शारिरीक रित्या सुदृढ बनवायचे असेल तर पहिल्या १००० दिवसात मातेच्या शारिरीक तसेच मानसिक स्वास्थ्याचीही काळजी आवश्यक आहे. याबद्दलचे मार्गदर्शन जेष्ठ पत्रकार निरजा चौधरी यांनी पुणे येथे युनिसेफ व्दारा आयोजित कार्यशाळेत केले.