बेरोजगारांना सरकारकडून खोट्या आशा दाखवण्यात येतात - सुप्रिया सुळे

Update: 2018-10-13 13:40 GMT

आज खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगावमध्ये आपल्या भाषणातून मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांना विनंती केली. त्या म्हणाल्या की, "मी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करते की या राज्यात फार मोठा दुष्काळ आहे. त्याच्यामुळे तातडीने तुम्ही दुष्काळ जाहीर करावा अशी मी नम्र विनंती करते. आपला महाराष्ट्र अडचणीत येतोय दुष्काळामुळे तर आपण यावर एकत्र येउन मात केली पाहिजे."

"पेट्रोल, वीज, गॅस सगळ्याच गोष्टींची किंमत कुठल्या कुठे नेऊन ठेवली आहे. या सगळ्या दरवाढीचा त्रास महिलांना जास्त प्रमाणात होतो, याचाही त्यांनी उल्लेख केला.

राज्यात रस्त्यात खड्डे आहेत की खड्डयात रस्ते हेच कळून येत नाही. आज प्रवास कसा करावा हेच समजत नाही. हे सरकार कर्जमाफीचा कधी करेल याची चिंता आज शेतकऱ्याला पडलेली आहे. आज देशातला बळीराजा जर रुसला तर भुकेने मरण्याची वेळ आपल्यावर येईल याचा विचार सरकारने करावा," असा इशारा त्यांनी दिला.

पाचोरा तालुक्यात सुप्रिया सुळेंनी महिला मेळाव्यास मार्गदर्शन देखील केले.

त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी केलेल्या बातचीतीमध्ये देखील त्या म्हणाल्या की, "आघाडी सरकारच्या काळात आदरणीय पवार साहेबांनी तब्बल ७२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती, या सरकारचे कर्जमाफी करण्यातले नेमके आव्हान काय आहे, हेच कळत नाही, बेरोजगारांना सरकारकडून खोट्या आशा दाखवण्यात येतात. अनेक योजना समोर आल्या पण त्यासाठी सरकार काहीच हालचाल करत नाही," असे बोलून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Full View

Similar News