शाळेच्या इमारतीसाठी रेखाने केली सव्वा दोन कोटींची मदत

Update: 2018-11-02 13:45 GMT

अभिनेत्री व राज्यसभा खासदार रेखा यांनी एका शाळेच्या बांधकामासाठी खासदार निधीतून मदत केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे शाळेची इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी रेखा यांनी खासदार निधीतून तीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

या निधीची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक शाम लांडे यांनी रेखा यांच्याकडे केली होती. त्यानुसार रेखा यांनी तीन कोटीचा निधी देण्याचे मान्य केले आहे. यााबाबत 2 कोटी 25 लाखांचा पहिला निधी महापालिकेकडे सोपवण्यात आला आहे. उर्वरित 75 लाख रूपये शाळेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणार आहेत.

Similar News