या दिवशी अडकणार देसी गर्ल विवाहबंधनात...

Update: 2018-10-17 11:51 GMT

बॉलिवूडमधीस देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी आणि आपल्या अभिनयाचा ठसा अगदी सातासमुद्रापार नेऊन ठेवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या लग्नाची तारीख नक्की झाली आहे. ऑगस्ट महिन्यात साखरपुडा पार पडल्यानंतर आता पुढील महिन्यांत ती विवाहबंधनात अडकणार आहे.

निक रोकासोबत तिचा विवाह ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात होणार असल्याची माहिती मिळत आहे. या दोघांचा विवाह हा पारंपारिक भारतीय पद्धतीने होणार आहे व या लग्नसोहळ्याला अनेकांची उपस्थिती असणार आहे. प्रियंका व निक हे दोघेही भारतातच लग्न करणार आहेत. व त्यासाठी प्रियंकाने राजस्थानमधील जोधपूर शहराची पसंती दर्शवली आहे. त्यामुळे जोधपूरमध्येच ते लग्नाच्या बेडीत अडकतील अशी शंका आहे.

 

 

 

Similar News