राष्ट्रीय समाज पक्ष स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज उपस्थित होते. रासपचे अध्यक्ष तथा राज्याचे पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर व रासपचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की,“भाजपच्या सत्ता परिवर्तनात रासपचे योगदान मोलाचे रासप हा अठरा पगड जाती जमातीला सोबत घेवून काम करणारा पक्ष असून भाजपच्या सत्ता परिवर्तनाच्या लढाईत त्यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. या पक्षाचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे”