महिलांना अपवित्र ठरवण्याचा रचला जाणार कट निकालाने हाणून पाडला आहे - तृप्ती देसाई
गेल्या चार दिवस सुरु असलेल्या शबरीमला मंदिराच्या वादावर न्यायालयाने आज महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. मासिक पाळी येणाऱ्या महिलांना शबरीमला मंदिर प्रवेशावर आज सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने मंदिरात प्रवेश करण्यासाठी तुम्ही महिलांना रोखू शकत नाही असं म्हणत हा निकाल जाहिर केला.
महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या तृप्ती देसाई या निकालाने आनंदी आहेत. त्यांनी या निकालाच्या सुनावणीनंतर लवकरच शबरीमला मंदिरात जाणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. याआधी तृप्ती देसाई यांनी शनिशिंगणापूरला शनिच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा तसेच हाजीअली दर्ग्यामध्येही महिलांना प्रवेश मिळावा यासाठी देखील आंदोलन केले होते. निकालानंतर तृप्ती देसाईंनी याबाबत आपले मत व्यक्त केले. त्यावेळी त्या म्हणाल्या, "हा संविधानाचा विजय आहे. महिलांना अपवित्र ठरवण्याचा कट रचला जात होता तो कट निकालाने हाणून पाडला आहे. "