केरळमध्ये झालेल्या पुरामुळे तेथील जनव्यवस्था विस्कळीत झाली आहे. तेथील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात सरसावला आहे. त्यातच महाराष्ट्रातील एका महिला बचत गटाने देखील त्यांना मदतीचा हात दिला आहे. या बचत गटातील महिलांनी एकत्र येत केरळ येथील पुरग्रस्तांसाठी मदत गोळा करुन ती केरळला रवाना केली. त्यांनी केलेल्या या मदतीचे महाराष्ट्रात कौतुक केले जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणविस यांनी या सर्व महिला बचत गटातील महिलांच्या या कामाचे कौतुक करत आपल्या व्टिट्व्दारे आभार देखील मानले आहेत.