तनुश्री-नाना वादात काँग्रेसची घोषणाबाजी...

Update: 2018-10-11 10:18 GMT

नाना पाटेकरांवर तनुश्रीने केलेल्या आरोपामुळे नाना चांगलेच वादात अडकले. यासर्व प्रकरणात आता काँग्रेसचा देखील हस्तक्षेप झाला आहे. ओशीवरा पोलीस ठाण्याबाहेर महिला काँग्रेसने नानांच्या विरोधात घोषणाबाजी करुन 'नाना पाटेकरांना अटक करा', अशी मागणी देखील केली.

तनुश्रीने काल बुधवारी नाना पाटेकर यांच्या विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याबाबतीत पोलीसांनी नानांसोबतच आणखी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कलम ३५४, व ५०९ या कलमाअंतर्गत नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाचे निर्माते सामी सिद्दिकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाना पाटेकर व तनुश्री दत्ताच्या या प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापले आहे असे म्हणणे चुकीच ठरणार नाही.

Similar News