आता महिला न्यायाधीश चालविणार सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ

Update: 2018-09-02 10:23 GMT

सर्वोच्च न्यायालयात आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. न्या. आर. भानुमती आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश असलेले खंडपीठ या दोन महिला न्यायाधीश ५ सप्टेंबरला चालविणार आहेत.

२०१३ मध्ये ही अशाच प्रकारे दोन महिला न्यायाधिशांनी एकत्र बसून खंडपीठ चालवले होते. न्या. ग्यान सुधा मिश्रा, न्या. रंजना प्रकाश देसाई या दोन महिला न्यायाधीशांनी एकत्र बसून खंडपीठ चालविले होते. त्यानंतर या ५ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात या इतिहाची पुनरावृत्ती होणार आहे.

महिला न्यायाधीशांची संख्या प्रथमच तीन

न्या. इंदिरा बॅनर्जी यांचा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश म्हणून नुकताच शपथविधी झाला आहे. यामुळे सुप्रीम कोर्टात महिला न्यायाधीशांची संख्या इतिहासात प्रथमच तीन झाली आहे.

Similar News