वाळवा तालुक्यातल्या कुरळप मधील मिनाई आश्रमशाळेतल्या अल्पवयीन मुलींवर घडलेल्या लैंगिक अत्याचाराचे संतप्त पडसाद उमटत आहेत. आज सकाळी कुरळप ग्रामस्थांनी मिनाई आश्रमशाळेवर हल्लाबोल करत कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर काही वेळातच या आश्रमशाळेवर गावातील आणि काही सामाजिक संघटनांच्या महिलांनी मिळून आश्रमशाळेवर हल्लाबोल केला.
[video data-width="640" data-height="352" mp4="http://maxmaharashtra.com/wp-content/uploads/2018/09/WhatsApp-Video-2018-09-27-at-19.53.40.mp4"][/video]
यावेळी आश्रम शाळेच्या कार्यालयात घुसून आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुरेश साळुंखे यांस बेदम मारहाण केली आहे. यावेळी संतप्त महिलांनी मुख्याध्यापकाला लाथाबुक्क्यांनी तसेच खुर्च्यांनी चोप दिला आहे. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत शिक्षकाला ताब्यात घेतले. मुख्याध्यापक हा नराधम संस्थाचालक अरविंद पवार याला मदत करत असल्याचा संशय असल्याने संतप्त महिलांनी ही मारहाण केली आहे.