सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे सिझन सुरु आहे. देसी गर्ल प्रियंका चोर्पानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी देखील आपल्या लग्नाचा मुहुर्त काढला. आता त्यांच्या पाठोपाठच अभिनेत्री आलिया भट्ट व रणबीर कपूर हे दोघेदेखील येत्या काही काळात विवाहबंध होण्याची शक्यता आहे.
रणबीर व आलियाने आपल्या नात्याची कबूली देउन त्यांचे रिलेशनशीप जाहीर केले आहे. रणबीरच्या कुटुंबीयांनेही आलियाला सून म्हणून पसंती दर्शवली त्यामुळे काही दिवसांत ऋषी कपूर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरच रणबीर त्याच्या लग्नाचा विषय काढणार असल्याची माहिती कपूर कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिली.
सुत्रानुसार आलियाही लग्नासाठी तयार आहे. तेव्हा आता आलिया भट्ट व रणबीर कपूर हे आपल्या लग्नाची तारीख कधी जाहीर करतात याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.