काही महिला वैयक्तिक फायद्यासाठी नैतिकता गहाण ठेवून तडजोड करतात - उषा ठाकूर
सध्या सुरु असलेल्या #MeTooवर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली आहे. परंतू याबाबत भाजप आमदार उषा ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
त्या म्हणाल्या की, काही महिला वैयक्तिक फायद्यासाठी स्वत:ची मूल्ये आणि विचारसरणीशी तडजोड करतात. त्यामुळे अनेकदा या महिला अडचणीत येतात. भारतात सध्या #MeToo चळवळ चुकीच्या मार्गावर चालली आहे. महिला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी नैतिकता गहाण ठेवून तडजोड करतात असे वक्तव्य त्यांनी केले आहे.