अभिनेत्री श्रद्धा कपूरचा हल्लीच सायना नेहवालच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा फोटो तिने व्हायरल केला होता. ती या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त होती. परंतू सध्या तिची तब्येत बिघडली असल्याने तिला शुटींग मध्येच थांबवावे लागले आहे.
तिला शुटिंग दरम्यान अंगात ताप जाणवत होता. त्यामुळे दिग्दर्शक अमोल गुप्तेंनी तिला आराम करण्याचा सल्ला देत घरी जाण्यास सांगितले. त्यानंतरच्या तपासणीने तिला डेंग्यू झाल्याचे समजले.
तिने गेल्याच आठवड्यात शुटिंगमधील काही फोटोही इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले होते. तिने या चित्रपटासाठी विशेष तयारी देखील केली असल्याचे ती म्हणाली होती. तिच्या प्रकृतीमुळे सध्या दिग्दर्शकांनी सायनाच्या बालपणीच्या दृश्यांचे चित्रिकरण सुरु करण्यात आले आहे.