धक्कादायक! पुण्यात आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Update: 2018-09-24 12:40 GMT

दिवसेंदिवस मुलींवर होणारे बलात्कार वाढतच जात आहे. त्यातच पुण्यात देखील सध्या मुलींवरील अत्याचार वाढले आहे. चार दिवसांपुर्वी पुण्यातील हिंजवडीजवळील कासारसाई येथील दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आला होता. त्

यातच आता पुण्यातील पाषाण सोमेश्वरवाडी येथे एका तीन वर्षाच्या मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. या चिमुरडीवर २१ वर्षाच्या नराधमाने बलात्कार करुन त्यानंतर तिचे नाक देखील कापले. त्या नराधमाने चिमुरडीला कुरकुरे दाखवून तिच्यावर निर्जन स्थळी बलात्कार केला. पोलीसांनी त्या नराधमाला अटक केली आहे. व याबाबतची चौकशी सुरु आहे. परीसरात या घटनेने खळबळ उडाली आहे.

Similar News