मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अखेर पोलीसांनी जेरबंद केले आहे. या नराधमाने तब्बल मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील १२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले होते. हा नराधम फूस लावून अल्पवयीन मुलींना निर्जनस्थळी घेऊन जात असे व त्यांच्यावर बलात्कार करत होता.
गेल्या १५ दिवसांपासून वसई व नालासोपाऱ्यात त्या नराधमाने दोन मुलींवर अत्याचार केले होते. या आधी त्याने मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात देखील दहशत पसरवली होती. पोलीसांनी तर या नराधमाला पकडण्यासाठी कंबर कसली होती. अखेर आज या नराधमाला पकडण्यास नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले. तुर्तास आरोपीची कसून चौकशी सुरु असल्याचे समजते.