एसटी महामंडळाची सावित्रीच्या लेकींना सुवर्ण संधी

Update: 2018-10-02 08:11 GMT

आजही प्रवासासाठी पैसे नाही या अडचणीने आजही शिक्षणापासून गोरगरीब वंचीत आहेत. त्यामुळे कितीतरी गुणवंत विद्यार्थीनी शिक्षण घेऊ शकत नाही. यासाठी एसटी महामंडळाने फार मोठा निर्णय घेऊन लाखो विद्यार्थीनींना शिक्षणाची संधी मिळणार आहे. ग्रामीण भागात एसटी हेच विद्यार्थी - विद्यार्थीनींचे प्रवासाचे माध्यम असते.

ग्रामीण भागातील अनेकांना पैशामुळे आपल्या शिक्षणाला पूर्णविराम द्यावा लागतो. खास करुन मूलींना शिक्षणाची संधी मिळत नाही. ज्यासाठी एसटी महामंडळाने इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थीनींना मोफत प्रवासाचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी हि सवलत फक्त दहावीपर्यंतच ठेवण्यात आली होती. परंतू त्यानंतर देखील मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी महामंडळाने ही सवलत आता बारावीपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एसटी महामंडळाला आर्थिक तोटा देखील आहे तरी देखील त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एसटी महामंडळाच्या निर्णयाने लाखो मुली शिकून समाजाला पुढे नेतील हे नक्की. तसेच या सोनेरी संधीमुळे विद्यार्थीनी व त्यांचे पालक दोघांनाही लाभ मिळून या योजनचा चांगलाच फायदा होणार आहे

Similar News