भारताची सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपल्या लग्नाची तारीख पक्की झाल्याची माहिती एका वाहिनीच्या मुलाखतीमध्ये दिली आहे. ती बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तिने आपल्या लग्नाच्या तारखेचा खुलासा केला आहे.
सायना मुलाखतीदरम्यान म्हणाली, "२० डिसेंबरपासून सुरु होणार्या प्रिमिअर बॅडमिंटन लिगमध्ये मी व्यस्त होणार आहे. त्यानंतर टोक्योमधील ओलंपिक्समध्ये देखील मला खेळायचे आहे. त्यामुळे १६ डिसेंबर हा एकच दिवस आहे ज्यादिवशी लग्न करणे शक्य होईल."
त्यामुळे १६ डिसेंबरला सायना आणि पारुपल्ली कश्यप दोघांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. यावेळी अनेक मित्रमंडळी, क्रीडा व चित्रपट जगतातील दिग्गज मंडळी यांची उपस्थिती असणार आहे.