सायना नेहवाल लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

Update: 2018-09-27 13:13 GMT

भारताची सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटू सायना नेहवाल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ती ज्याच्यासोबत विवाह करणार आहे तो स्वत: देखील अनुभवी असा बॅडमिंटनपटू असून ज्याप्रमाणे सायना ऑलिम्पिकमधील कास्यपदक विजेती आहे तसाच कश्यप देखील राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आहे. त्यांच्या नात्याबाबतची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. त्यांच्यातील खूप वर्षांच्या मैत्रीचे रुपांतर अखेर प्रेमात झाले असून ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. १६ डिसेंबर रोजी त्यांच्या विवाह होणार असल्याचे समजते. त्यांच्या लग्नाच्या पाच दिवसांनंतर रिसेप्शन आयोजीत करणार असून त्यामध्ये अनेक मित्रमंडळी, क्रीडा व चित्रपट जगतातील दिग्गज मंडळी यांची उपस्थिती असणार आहे.

Similar News