काल २१ आॅक्टोबर रोजी झालेल्या डेन्मार्क ओपनच्या महिला एकेरीचा अंतिम सामन्यात भारताची सर्वोत्कृष्ट खेळाडू सायना नेहवालला पराभव आला आहे. तैवानच्या ताइ त्झू यिंग विरुद्ध हा सामना होता. परंतू यामध्ये पराभव स्वीकारुन सायना नेहवालला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
ताइ त्झू यिंगने या लढतीत सायनाचा १३-२१,२१-१३,६-२१ असा तीन सेटमध्ये पराभव करत विजेतेपद मिळवले. सायनाने याआधी २१ आॅक्टोबर २०१२ ला डेन्मार्क ओपनचे विजेतेपद मिळवले होते. आणि काल २१ आॅक्टोबरलाच तिला या सामन्यात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ताइ त्झू यिंगने सायनाचा हा ११ व्या वेळी पराभव केला आहे.