मुंबईजवळच्या कल्याणमध्ये रेल्वे स्थानिकबाहेर रिक्षाचालकाची मुजोरी पाहायला मिळाली. परवाना मागणाऱ्या एका महिला वाहतूक पोलिसाला या मुजोर रिक्षाचालकाने फरफटत नेले. मंगळवारी (09 ऑक्टोबर) संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे.
आशा गावंडे असे महिला वाहतूक पोलिसाचे नाव असून त्यांनी काल संध्याकाळी रिक्षाचालक नागेश अलवागिरी याच्याकडे परवाना देण्याची मागणी केली. मात्र तरीही या मुजोर चालकाने रिक्षा सुरुच ठेवून आशा गावंड यांना फरफटत नेले.