काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी माझ्याशी गैरवर्तणूक केली, परंतु पक्षानं दखल घेतली नसल्याचा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियांका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
काय म्हणाल्या प्रियांका चतुर्वेदी ?
लोकसभा निवडणुकीत मला तिकीट मिळेल अशी आशा होती, पण तिकीट न दिल्याने मी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असे म्हणणे योग्य ठरणार नाही.
मी विचार केल्यानंतरच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा प्रचार करणार.
पक्षाची सेवा करताना मला, माझ्या कुटुंबियांना व मुलांना किती धमक्या आल्या, किती शिवीगाळ झाली, याची तुम्हाला आठवण करून द्यायला नकोच. माझ्या आकांक्षाना काँग्रेस पक्ष योग्य वाव देईल या अपेक्षेमुळे मी कधीही काही मागितलं नाही. मला खेद वाटतो की, काँग्रेस पक्ष महिलांची सुरक्षा, सन्मान व सबलीकरणाला प्राधान्य देतो, परंतु ते कृतीत मात्र दिसलं नाही.
I am absolutely overwhelmed and grateful with the love and support I have got across board from the nation in the past 3 days.
I consider myself blessed with this immense outpouring of support. Thank you to all who have been a part of this journey. pic.twitter.com/WhUYYlwHLj
— Priyanka Chaturvedi (@priyankac19) April 19, 2019