मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजप उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुरामला देशभक्त म्हटल्यानंतरही भाजपने प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कोणती कार्य़वाही केली नाही. त्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांच्या या वक्तव्याबाबत देशात संताप व्यक्त केला जात असून कॉंग्रेससह बहुतेक पक्षांनी प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यानंतर आता एनडीएचे घटक पक्ष असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर निशाणा साधत भाजपला गांधीजींबाबत अशा प्रकारची विधान कधीच स्वीकारली जाणार नाहीत, असं सांगितलं आहे.
साध्वीचं वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची हा भाजप अंतर्गत प्रश्न आहे, पण साध्वीची पक्षातून हकालपट्टी करण्याचा भाजपाने विचार करावा, आपण अशा तऱ्हेची वक्तव्ये सहन करू शकत नाही, अशाप्रकारच्या विधानांसाठी त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा विचार व्हायला हवा असं म्हणत नितीश कुमार यांनी भाजपला सूचक इशारा दिला आहे. तसंच देशातील निवडणूका इतक्या प्रदीर्घ काळ असू नयेत असंही देशातील निवडणुकांच्या कालावधी बाबत बोलताना नितीश कुमार यांनी सांगितलं.