#MeToo बदल घडवायचा असले तर लोकांनी मानसिकता बदलावी – मलायका अरोरा         

Update: 2018-10-31 12:39 GMT

आज एका कार्यक्रमा दरम्यान अभिनेत्री मलायका अरोरा हिने #MeToo बाबत आपले मत व्यक्त केले.

या कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना ती म्हणाली की, #MeToo ची फक्त चर्चा होतेय, बदल मात्र कुठेच दिसत नाही, #MeToo मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी आपल्यावर झालेला अन्यायाला वाचा फोडली. यात अनेक नामवंत आणि दिग्गज कलाकारांवर आरोप झाले आहेत. अनेक दिवसांपासून ' #MeToo 'बद्दल ऐकत आणि वाचत आहे. बॉलिवुडबद्दल बोलायचं झालं, तर इथं लोकं केवळ चर्चा करताना दिसतायेत. एका रात्रीत हा बदल शक्य नाही, , समाजात बदल घडवायचा असले तर लोकांनी मानसिकता बदलून प्रत्यक्षात कृती केली पाहिजे, असे ती म्हणाली.

 

Similar News