राज्याच्या ग्रामविकास खात्याच्या वतीने यशवंत पंचायत राज अभियानातील उत्कृष्ट काम करणा-या पंचायत समित्यांना पारितोषिक दिली जातात. हा कार्यक्रम काल २६ तारखेला मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात आयोजीत केला होता. या कार्यक्रमाला राज्यपालचे विद्यासागर राव व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली होती.
या कार्यक्रमात ग्रामविकास खात्याची पारितोषिके विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील दोन पंचायत समित्यांनी पटकावली आहेत. ९ लाख रुपयांचा पहिला पुरस्कार बीड जिल्हयातील अंबाजोगाई पंचायत समितीला देण्यात आला. तर दुसरा ७ लाख रुपयांचा पुरस्कार परळी पंचायत समितीला मिळाला. यावेळी या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या दोन्ही पंचायत समितींचा सन्मान केला.