काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतून भारतात परतलेली तनुश्री #MeToo मधून चर्चेत आली. तिने नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपानंतर काहींनी तिला पाठिंबा दर्शवला तर काहींनी तनुश्रीने पुनरागमनासाठी हा खटाटोप केला असा आरोप देखील केला.
तिने एका मुलाखतीत तिची पुनरागमनाची इच्छाच नसल्याचे स्पष्ट केले आहे. तिने तिला आलेली ‘बिग बॉस १२’ची ऑफर देखील यावेळी मान्य केली. पण तिने याबाबत म्हटले की, आता ‘बिग बॉस’च काय पण बॉलिवूडमध्येही पुन्हा जायचं नाही. तिथे जाण्याचा उद्देशच नाही मला या रुपेरी पडद्यावर परतण्याची कोणतीही इच्छा नाही, मी आठ वर्षांपूर्वीच या क्षेत्रातून बाहेर पडले आहे. आठ वर्षे हा खूप मोठा काळ आहे. आता या क्षेत्रात मला अजिबात परतायचं नाही असे म्हणून तिने तिचे मत स्पष्ट केले.