राष्ट्रवादीचा पक्षाचा बीडमध्ये संकल्प मेळावा नियोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती, मेळाव्यात शरद पवारांनी देखील उपस्थिती लावलेली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर चांगलीच घणाघाती टिका केली आहे.
त्या म्हणाल्या की, आज देशातील मोठे राजकारणी नेते बीडमध्ये आले आहेत, त्यांचं पहिल्यांदा स्वागत. पण आपला उमेदवार उभा करण्यासाठी सगळेच पक्ष जात असतात. पण बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते येतात की, लोकसभेत पडण्यासाठी कोण उभं राहणार आहे?यासाठी, असे बोलून त्यांनी राष्ट्रवादीवर टिका केली.
तसेच इथं निवडून येण्याचे कुणाला झोपेतही विचार येत नाहीत, असं खडसावून देखील सांगितले.