खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्र्यांची भेट

Update: 2018-10-31 13:33 GMT

आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केरळचे मुख्यमंत्री श्री.पी.विजयन यांची भेट घेतली. नैसर्गिक आपत्तीमुळे केरळमध्ये उदभवलेल्या पूरस्थिती नंतर सुरू असलेल्या लोकांच्या पुनर्वसनाबाबत सद्भावना व्यक्त करत त्यांनी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केरळचे अध्यक्ष आ. थॉमस चंडी आणि वाहतूक मंत्री ए.के. ससिंद्रन उपस्थित होते.

त्यानंतर त्रिवेंद्रम येथील सभेत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्रिवेंद्रम येथील सभेतील श्री.सुभाष चंद्रन यांनी सुप्रिया सुळे यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

तसेच केंद्राकडून केरळला सापत्न वागणूक मिळत असल्याच्या निषेधार्थ व वाढती महागाई व दरवाढ याविरुद्ध केरळमधील कार्यकर्त्यांसह निषेध व्यक्त करत रॅली काढली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, केरळच्या वतीने केंद्र सरकारच्या पक्षपाती धोरणाबाबत काढलेल्या या रॅलीत सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या.

 

Similar News